Ticker

6/recent/ticker-posts

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल






अहिल्यानगर: नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. अघोरी विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खरातच्या कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणी पीडित महिलांची ओळख उघड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे.


पीडित महिलांची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी कोपरगावमधील राहुल शिंदे, योगेश आढाव आणि बीडमधील संदीप गरजे या तीन व्यक्तींविरोधात अहिल्यानगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२), ३ (५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० च्या कलम ६७ (अ) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान, संदीप गरजे याने योगेश आढावला आणि योगेशने राहुल शिंदेला हे व्हिडीओ पाठवल्याचे समोर आले असून, पोलिसांनी व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्यांची संपूर्ण साखळीच उघडकीस आणली आहे.


Post a Comment

0 Comments