Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर ब्रेकिंग । नई जिंदगी परिसरात २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

 





सोलापूर: शहरांमधील नई जिंदगी परिसरातील भीमाशंकर नगरमध्ये एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अरफूनुसार युसुफ सय्यद (वय २०, रा. ४१४, भीमाशंकर नगर, नई जिंदगी, सोलापूर) असे मयत तरुणीचे नाव आहे. आज दुपारी ३:१० वाजेच्या सुमारास तिने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिला तातडीने उपचारासाठी नई जिंदगी येथील कादरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती तिला 'मृत घोषित' केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, मयत अरफूनुसार हिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र, तिच्या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Post a Comment

0 Comments