Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर ब्रेकिंग । मोहोळ तालुक्यात तलाठी लाच घेताना पकडला रंगेहात; ACB ची सापळा कारवाई



सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तलाठी सुदर्शन रमेश जाधव (वय ३०) याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २८ मार्च २०२६) करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन जाधव हे सजा वाफळे (ता. मोहोळ) येथे तलाठी म्हणून कार्यरत असून, त्यांनी तक्रारदार व इतर दोन ट्रॅक्टर मालकांचे मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले होते. त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी प्रत्येकी ३३ हजार रुपये, असे एकूण ९९ हजार रुपयांची लाच मागितली होती.

यापैकी इतर दोन ट्रॅक्टर मालकांनी प्रत्येकी ३३ हजार रुपये देऊन एकूण ६६ हजार रुपये दिले होते. तक्रारदार राजकिरण सावंत यांनी २३ हजार रुपये दिले होते, तर उर्वरित १० हजार रुपये देणे बाकी होते. ही रक्कम २८ मार्च रोजी देण्यास सांगण्यात आले होते.दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी करून सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी तलाठी सुदर्शन जाधव यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणी माढा पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments